जुबेर शेख
जिल्हा प्रतिनीधी लातुर
लातुर/जगातील २०० राष्ट्रांमध्ये रोटरीचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२मध्ये एकूण ११ जिल्ह्याचा समावेश असून यामध्ये लातूर जिल्ह्याचा समाविष्ट आहे. लातूर शहरांमध्ये एकूण ०६ रोटरी क्लब आहे. यामध्ये रोटरी वर्ष २००७-०८पासून रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन विविध सामाजिक कार्य सुरु आहे.
या क्लबच्या रोटरी वर्ष २०२१-२२च्या अध्यक्षपदी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्रा.डॅा.संजय दूर्वासराव गवई यांची तर सचिवपदी निळकंठ स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.
या क्लबमध्ये क्लब प्रशिक्षक म्हणून प्रा.गुणवंत बिरादार, उपाध्यक्ष विश्वनाथ स्वामी, सहसचिव माधव गोरे, कोषाध्यक्ष बी.पी.सूर्यवंशी, आय पी पी डॅा.मल्लिकार्जुन हुलसुरे, सार्जट ॲट आर्मस सुधीर सातपुते, क्लब ऍडमिनिस्ट्रेशन लक्ष्मीनारायण कडेल, मेंबरशिप डेव्हलपमेंट प्रा.गुणवंत बिरादार, सर्विस प्रोजेक्ट विश्वनाथ स्वामी (सावळे), इंटरनॅशनल सर्विस डॅा.विजय राठी, टी आर एफ विठ्ठल कावळे, डिस्ट्रिक एमफीसीस धनंजय राऊत, आर आय डॅा.विजय राठी, पब्लिक इमेज संगमेश्वर स्वामी, युथ सर्विस नितीन जगताप, व्होकेशनल व्होकेशनल सर्विस विठ्ठल कावळे, पर्यावरण धनंजय राऊत, मानवी विकास डॅा.गोपीकिशन भराडिया, लिट्रसी माधव गोरे आणि विग्न्स नितीन जगताप आदि सदस्यावर रोटरी वर्ष २९२१-२२ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या या अध्यक्ष व सचिव निवडीबद्दल रोटरी परिवारातर्फे तसेच महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवी संस्था पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
या क्लबमध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.सिद्राम डोंगरगे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.शिवप्रसाद डोंगरे, लातूर शहर महानगरपालिका लातूरचे नगरसेवक प्रा.राजकुमार जाधव, प्रा.विलास लुटे, प्रा.माधव नायने, प्रा.रंजीता वाघमारे, प्रतिमा कांबळे, बळीराम केंद्रे, सुनील मांदळे, प्रा.प्रकाश राठोड, धनंजय वराळे, प्रा.विद्या आचार्य, माधव भिसे मुख्याध्यापक मठपती डॅा.विजय भामरे, शेख शमशुद्दीन व मनोज वाघमारे आदी नवीन सदस्य झाले आहेत त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.











