गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले वारी हनुमान हे तीर्थक्षेत्र अकोला जिल्ह्यात तसेच बुलढाणा जिल्ह्यात पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. श्री, समर्थ रामदास स्वामी यांनी चारशे वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केलेली आहे दर शनिवारी रविवारी येथे भाविक भक्त दर्शनाला परिवारासोबत येतात रविवार हा दिवस सुट्टीचा असल्याकारणाने येथे कर्मचारीवर्ग नोकरीदन नोकरी करणारे लोक सुद्धा रविवार दिवस सुट्टीचा असल्यामुळे येतात. परंतु कोरोना काळात वारी हनुमान मंदिर सहा महिन्यापासून बंद असल्यामुळे भक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागले. येथे येणारे भक्तगण व पर्यटक सातपुड्याचा आस्वाद सुद्धा घेतात तीर्थक्षेत्र वारी हनुमान हे सातपुडाच्या पायथ्याशी असल्यामुळे ईथ येणाऱ्या भाविक भक्त या तीर्थक्षेत्रात नैसर्गिक दृश्य तसेच वान धरण सुद्धा भक्तांना पहावयास मिळतो. येथे तीन जिल्ह्याचा त्रिवेणी संगम सुद्धा आहे .तरी आता कोरोणाचा पादुर्भाव कमी झालाअसता शासनाने वारी हनुमान हे तीर्थक्षेत्र उघडावे .भक्तांना दर्शनाची सोय होईल व अनेक भाविक भक्तांना मारुती रायाचे दर्शन होईल म्हणून शासनाने याकडे लक्ष देऊन मंदिर दर्शनाकरिता उघडावे.अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे भाविक भक्त करीत आहे.