किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील गोदावरीच्याद काठावर जिथे दळणवळणासाठी इंग्रजांच्या काळापासून ते आजपर्यंत कुठलाही रस्ता आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने बनवला नाही अशा दुर्गम भागातील कान्हेगावच जिल्हा परिषदेच्या व इतर ठिकाणच्या शाळेत पावसाळ्यात चिखल तुडवीत सात आठ किलोमीटर पायी चालत जिद्दीने व चिकाटीने शिकणारे लहान हजारो मुलं मुली आहेत.
कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मृत्यु झालेल्या आणी कर्जबाजारीपणा मुळे आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवणा-या शेतकरी भूमिपुत्रांच्या निराधार मुला मुलींना पातुर येथील रहिवासी असलेले परंतु पुण्यात स्थायिक झालेले ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी त्यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशातून शालेय साहित्याचे वाटप केले त्यामध्ये वह्या,पेन,पेन्सिल,रंगकांड्या, पिण्याच्या पाण्याची बाॅटल, कंम्पास पेटी व दफ्तरचा समावेश आहे.एकूण बेचाळीस मुला मुलींना साहित्याचे वाटप करण्यात आले.
आपल्या स्वतःच्या किंवा आई, वडील,मुला-मुलींचे वाढदिवस अथवा कुठल्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा करायचा झाल्यास समाजातील निराधार व दुर्बल लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आनंद कसा मिळेल ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्पन्न व्हावयास हवी याचं आत्मीय समाधान परमोच्च सुखापेक्षा कमी नाही असे मत यावेळी पातुर तालुका विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी मांडले.
याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक सतिष कांबळे,सरपंच आशाताई ओव्हाळ,माजी सरपंच संतोष भंडारे,माऊली भंडारे,महेश चौधरी,शिक्षक आणी पालक वर्ग यांची उपस्थिती होती.