पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड 26 : कन्नड तालुक्यातील बीपखेडा येथील मनसुब लक्ष्मण कवडे या शेतकऱ्यांने कर्जबाजारी पणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी बारा च्या सुमारास घडली.मनसुब कवडे यांच्यावर सरकारी बँक,खासगी पतसंस्था, सोसायटीचे कर्ज होते.त्या सर्व कर्जाची उलटपालट करायची असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते त्याच विवेचनात होते.रविवारी सकाळी पत्नीला गाईला गवत आणायला शेतात पाठवले.स्वताहाच्या गोठयात विषारी औषध घेऊन खाटेवर पडले.पत्नी गवत घेऊन गोठयात गेल्यावर त्यांना पती मनसुब कवडे दिसले.त्यांनी आरडाओरड केली.परंतु तो पर्यत त्याचा जोवणज्योत मालवली होती. औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठवण्यात आला.वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कांबळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सून,नातवंडे असा परिवार आहे.कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.