रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
अलीकडच्या काळात रस्ता अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून रस्ता अपघाता त मरणारांचे प्रमाण सुद्धा खूप वाढले आहे.मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी व निदान स्वतःचा जीव वाच वण्यासाठी तरी मोटर सायकल चालवंतानी तरुणांनी हेल्मेट जरूर वापरावे असे आवाहन लोकजागर मंचचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी केले.रविवार हा दिवस तेल्हाऱ्यासाठी घातवार ठरला.या एकाच दिवशी तेल्हारा परिसरात चार जण रस्ता अपघातात मृत्युमुखी पडले.रस्ता अपघातात बळी पडणाऱ्यांमध्ये किंवा कायम चे अपंगत्व येणाऱ्यांमध्ये तरुणांचीच संख्या जास्त असते.या अपघातात कुणाचा भाऊ,कुणाचे वडील तर कुणाचा पती बळी जातो व ते घर पोरके होते हे सर्व होणारे अपघात टाळण्या साठी तरुणांनी गाडी चालवताना हेल्मेट जरूर वापरावे असे आवाहन अनिल गावंडे यांनी केले.महाराष्ट्रात रस्ता अपघातात दररोज सरासरी चाळीस लोक मृत्युमुखी पडतात.रस्ता अपघातात बळी पडणाऱ्यांचे प्रमाण एखाद्या युद्धात किंवा कोरोना सारख्या साथीच्या रोगापेक्षाही जास्त असून ही बाब गंभीर असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.प्रहार जनशक्ती पक्षाच्या व लोकजागर मंचच्या प्रत्येक सदस्याने व कार्यकर्त्याने हेल्मेट वापरणे सक्तीचे असून प्रसंगी मी स्वतः हेल्मेट पुरवेल असे सुद्धा त्यांनी म्हटले.


