सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा:- संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल ग्राम वसाळी येथे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट लागल्याने एका आदिवासी विधवा महिलेच्या घराला २० मे रोजी आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. एक आदिवासी जमातीचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. लाखो रुपयाचे नुकसान या आगीत झाले आहे. ग्राम वसाळी येथील तेजली बाई रमेश मोरे आपल्या कुटुंबासह शेतात गेली असता ही घटना घडली आहे. यांची हे घर पुनर्वसन मध्ये सागाच्या लाकडी खांबाच्या व इंग्रजी कौलारू घर असून विद्युत शॉट सर्किट मुळे २० मे रोजी आग लागल्याने सर्व साहित्य जळून खाक झाले, यामध्ये सागाचे ४९ खांब, १० क्विंटल गहू, ज्वारी, ५ क्विंटल मक्का १ क्विंटल भुईमून, तूर डाळ, ५० किलो मुंग डाळ, उडीद डाळ,२० किलो हरभरा अशाप्रकारे धान्य जळून खाक झाले आहे. तसेच आंघरून, पांघरून कपडे सह रोख रक्कम, अडीच किलो चांदी, ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नगद २ लाख ३० हजार रुपये, आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड, मुला – मुलीची शाळेची कागदपत्रे, एलईडी टीव्ही, मोबाईल फोन, शिलाई मशीन, दोन कूलर, दिवान व कपाट अशा सर्वच उपयोगी वस्तूंची राख रांगोळी झाल्याची माहिती आहे. कुटुंबात विधवा महिला व अल्पवयीन तीन मुली एक मुलगा आहे. आग लागली त्यावेळी सर्व शेतात गेली होती, त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. यामध्ये घराचे व घरातील सर्व साहित्य अंदाजे १६ लाख ७८ रुपयाचे नुकसान झाले आहे. शासनाने सदर कुटुंबास त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. या घटनेचा पंचनामा करतेवेळी मंडळ अधिकारी राजू चामलोट, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक बी.पी. घोडगे, तलाठी एस. ए. गाडे, सोनाळा तलाठी डी. एच.जाधव व नागरिक उपस्थित होते. सदर घटना घडल्याने महिला सह लहान मुले आकांताने रडत होती.


