विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ:उमरखेड तालुक्यातील मौजे दिघडी येथील ह भ प प्रकाश महाराज राणे यांनी मागील बऱ्याच वर्षापासून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची जबाबदारी यशस्वी पंने पार पडली आहे .किर्तनासोबत सामाजिक कार्यातून सुद्धा त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या या कार्याची दखल सर्च फाऊंडेशन व सत्यशोधक सामाजिक फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच युवा सामाजिक मंच पुणे यांच्या दिला जाणारा महाराष्ट्र गौरव आदर्श कीर्तन सेवा प्रबोधनरतन पुरस्कार २०२४जाहीर झाला आहे. दि २जून२०२४रोजी सायंकाळी ५वा ड्रा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.


