रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सात पुड्याच्या पायथ्याशी अस लेल्या नई तलई या अतिदुर्गम आदिवासी गावात आदिवासी गर्भवती महिला सौ. लता कवलसिंग कासदेकर हिला तीव्र प्रसूती वेदना सुरुझाल्या. रुग्णवाहिकेसाठी 102 वर फोन केल्यावर चालक आसिफ सौदागर हे रुग्ण वाहिका घेऊन तात्काळ आदिवासी महिलेच्या घरी पोहोचले. एवढ्यातच वादळा ने आक्रमक स्वरूप धारण केले व सर्वत्र आपले थैमान मांडणे सुरू केले. प्रचंड मेघगर्जना, विजांचा कडक डाट, सोसाट्याचा वारा आणि तुफानी वादळ सुरु झाले. अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडली. अशापरिस्थितीत प्रसव वेदनेने विव्हळत असलेल्या गरोदर महिलेला हिम्मत करून 102 चालक आसिफ सौदागर यांनी रुग्णालयात पोहोचविण्याचा विडा उचलला. त्यात त्यांना आशा सेविका नंदा ठाकरे यांची साथ मिळाली. गरोदर महिला, तिच्या सोबती महिला, आशा सेविका या सर्व महिलांना घेऊन आसिफ सौदागर यांनी पुढचा प्रवास हिमतीने सुरू केला. परंतु निसर्ग त्यांना पुढे जाण्याची अनुमती देत नव्हता. ठिक ठिकाणी अनेक झाडे रस्त्या वर आडवी पडली होती. त्यातल्या त्यात अतिदुर्गम आणि खस्ताहाल रस्ता असल्याने आधीच अपघाता ची शक्यता वाढली होती. परंतु तरीही चालक आसिफ सौदागर यांनी कर्तव्य तत्परता दाखवत जागोजागी उतरून झाडांच्या फांद्या तोडून व पूर्ण ताकदीने झाडांना ओढून रस्त्यातून रुग्णवाहीका जाण्याइतपत मार्ग ठीक ठिकाणी मोकळा केला. आणि हिवरखेड प्राथ मिक आरोग्य केंद्र गाठले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद गवई यांनी गरोदर महिलेला तपासून अकोला नेण्याचा सल्ला दिला. तात्काळ 108 रुग्णवाहिने केने महिलेला अकोला येथे नेण्यात आले. तिथे महिलेची सुरक्षित प्रसूती होऊन तिला कन्यारत्न प्राप्त झाले. बाळ आणि आई दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली. नेहमी आरोग्य विभागाच्या ढेपाळलेल्या कारभाराच्या आणि त्यामुळे अनेक रुग्ण दगावल्याच्या बातम्या कानावर येत असतात. परंतु अशा नका रात्मक परिस्थितीत आरोग्य विभागाची अशी सकारात्मक कामगिरीची बातमी मनाला समाधान देणारी ठरत आहे. आसिफ सौदागर यांनी जशी कर्तव्य तत्परता दाखविली ती खरचं कौतुकास्पद असून इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांनीही आपल्या कार्या प्रती तत्पर असावे… धिरज बजाज सामाजिक कार्यकर्ते हिवरखेड. गुपचूप काढलेला व्हिडिओ होत आहे व्हायरल.काळोख रात्रीत आसिफ सौदागर आपले कर्तव्य पार पाडत असताना आणि तुफानी वादळ आणि अवकाळी पावसात महिलेला सुखरूप रुग्णालयात पोहोच विण्यासाठी कोणताही दिखा वा न करता रस्त्यावरील झाडां च्या फांद्या बाजूला करीत स्वतः रस्ता मोकळा करत असताना गाडीतील एका महिलेने गुपचूप त्यांचा व्हिडिओ काढून घेतला. आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून आदिवासी ग्रामस्थांसह अनेक नागरिक हिवरखेड वारकरी रुग्ण वाहिका 102 चे चालक आसिफ सौदागर, आशा सेविका नंदा ठाकरे आणि संपूर्ण आरोग्य विभागाचे कौतुक करीत आहेत.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)