सिद्धोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दिनांक १५ मे २०२४ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचे मत बजरंग मनोहर सोनवणे व्यक्त केले असून याप्रकरणी केंद्रिय निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्यात आली असून याप्रकरणी परळी वैजनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचे नागरीकांचे मत येत आहे. बीड लोकसभा मतदार संघात दिनांक १३ मे २०२४ रोजी झालेल्या मतदान करण्यात आले. यावेळी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात अनेक भागात मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचे मत बजरंग मनोहर सोनवणे यांनी त्याचबरोबर याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा अन्य संबंधित विभागांना तक्रार देण्यात आली असून परळी वैजनाथ तालुक्यातील अनेक मतदारांचा मतदान करण्याचा हक्क यावेळी हिरावून घेतला असल्याचे मत बीड लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सोनीमोहा, पिंपरवाडा, मैंदवाडी, चाटगाव आष्टीमध्ये वाली, पाटोद्यात वाघीरा, परळी वैजनाथ मतदार संघातील धर्मापुरी, डिग्रस, इंजेगाव, नाथ्रा, कौडगाव साबळा, जिरेवाडी, कन्हेरवाडी, वालेवाडी, सारडगाव, केजमधील लाडेवडगाव, माजलगाव येथील गोविंदवाडी जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदार संघातील ग्रामीण भागात मतदान केंद्रावर मतदान चालू होताच काही तासातच मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांनी बीड जिल्हा पोलिस अधीक्षक तथा बीड जिल्हाधिकारी यांना मोबाईल द्वारे मतदान केंद्रावर होत असलेल्या बोगस मतदानाची माहिती देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही करण्यात आली किंवा दखल घेतली नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील मतदान केंद्रावर होत असलेल्या मतदान केंद्रावर बोगस मतदान करणाऱ्यांना मतदान केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचारी साथ असल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान प्रक्रीयेवेळी मतदान केंद्रावर मुस्लीम समाज आणि मागासवर्गीयांचा मतदानाचा अधिकार यावेळी हिरावून घेण्यात आला. दोन्ही समाजातील बांधवांना मतदान करण्यापासून वंचित ठेवण्यात आले. ही घटना लोकशाहीला काळींबा फासणारी असून अशा घटना घडत असताना जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तथा पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेऊन घडत असलेल्या घटनाबाह्य प्रकरणी डोळेझाक करीत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, निवडणूक निरीक्षक अधिकारी लेखी तक्रार देण्यात आली असून जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक प्रशासनाने काय कार्यवाही करणार हा प्रश्न जिल्ह्यातील सामान्य जनतेला पडला आहे.