अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी शहरातील मुख्य रस्त्यावर नेहमी वर्दळ असते,शहरातील छत्रपती शिवाजी चौक जून बस स्टॉप ते नटराज चौक व गांजेगाव रोड , ढाणकी बाजार समिती ते नवीन बस स्टॉप यादरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, दवाखान्यात,शासकीय कार्यालये, बँका यांमुळे विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे वाहतूक अधिक प्रमाणात असते.बँकांना आणि दुकानांना वाहने लावण्याच्या सुविधा नाहीत. त्यातच रस्त्यात लावलेल्या बेसिस्त ऑटो,गाड्या, दुकानांच्या पाट्या, भाजीपाला- फळविक्रेते यांच्या हातगाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने बसून विक्री करतात. यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे .शहरातील जुने बस स्टॉप ते नटराज चौक व बिटरगाव रोड या मुख्य रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. रस्त्याच्या आजूबाजूला दुतर्फा विविध वस्तू, खाऊच्या हातगाड्या व पाणीपुरी विक्रेता हातगाडी लावण्यात येतात. त्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या हातगाडी आणि त्या समोरील ग्राहकांच्या वाहनांचा अडथळा येतो.त्यामुळे या भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच बाजार करण्यासाठी आलेले नागरिक आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावत असल्याने वाहने निघण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याने वारंवार वाहतूक ठप्प होते.शहरात विविध कामांनिमित्त येणारे नागरिक शाळा, कॉलेजचे विद्यार्थी यांना या कोंडीतून वाट काढत जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागते. यातून एखादी दुचाकी किंवा चारचाकी गाडी पायावरून जाण्याच्या घटना घडतात.मागील काही महिन्या खाले ढाणकी बाजार समिती जवळ बेसिस्त ऑटो पॉईंट मुळे एका तरुणाचा जीव गेला असून सुद्धा याकडे वाहतूक पोलीसाचे गांभीर्याने लक्ष नाही.रस्त्यावर गाडी मागेपुढे घेण्यावरून वादावादी होते. सोमवारी आठवडेबाजार असतो. या दिवशी तर बाहेरून भाजीपाला विकायला आलेले व्यापारी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मालविक्रीसाठी बसतात. रोडवरही बाजार भरत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, परंतु वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे .सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत परिस्थिती अधिक बिघडते आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही वाहतूक पोलीस तैनात नाही?पुन्हा कोणाचे निष्पाप जीव जाण्याअगोदर बेकायदेशीरपणे रस्त्यावर ऑटो,वाहने व हातगाडी उभी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


