विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: माणूस निघून गेल्यावर मिस यु म्हणण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत विथ यु म्हणायला शिका असे प्रतिपादन डिकसळ (ता. इंदापूर )येथे कै. दशरथ सदाशिव पानसरे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त आयोजित केलेल्या फुलाच्या कीर्तनात युवा कीर्तनकार ह. भ. प. संतोष महाराज गाडेकर यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या मुखाने जर आपण एकामेकांशी प्रेमाने बोललो दुसऱ्याशी बोलताना चांगलं बोललो भगवंताचे नामस्मरण केलं तर आपोआप आपली वाणी पुण्यवंत होते वाणी पुण्यवंत झाल्यानंतर आपोआपच आपला देह पवित्र होतो, म्हणून तुकोबाराय अभंग मधून सांगतात कि रात्र दिवस जर आपण भगवंताचे नामकरण केलं तर भगवंताच्या नामस्मरण सतत घेतल्यामुळे आपली वाणी पुण्यवंत होते, पाणी पुण्यवंत झाल्यानंतर आपोआपच आपला देह पवित्र होऊन जाईल, भगवंताच्या नामस्मरणामुळे आपल्या जीवनातील बापाच्या राशीची राशी जळून जातील भगवंताचे नामस्मरण केल्यानंतर भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळेपणा उरत नाही महाराजांनी सांगितलं काय त्यावरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी, आपण आपल्या कंठामध्ये त्या भगवंताच रात्र निवास नामस्मरण केले पाहिजे, शेवटी महाराजांनी सांगितलं जीवन जगत असताना आपण जर सतत भगवंताचे नामस्मरण केलं तर आपोआपच शेवटच्या क्षणाला आपल्या मुखामध्ये बघून त्याचे नामस्मरण येत असतं, तुकोबारा सांगतात अंतकाळी नाम आले ज्याच्यामुखा तुका म्हणे सुखा पार नाही, शेवटच्या क्षणाला आपल्या मूकामध्ये भगवंताचा नाम येण्याकरता त्याआधी आपल्याला आपलं सगळं आयुष्य परमार्थमध्ये वेथित करावे लागतात, म्हणून जीवन जगत असताना रात्री दिवस फक्त आणि फक्त भगवंताचा नामस्मरण करा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे किंवा जेथे जातो तिथे तू माझा सांगाती. फक्त आणि फक्त भगवंताचे नामस्मरण करा आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.


