मनोज गवई जिल्हा प्रतिनिधी अमरावती
चांदुर रेल्वे / शहरातील नागरिकांना मास विक्रेत्याकडून त्रास होऊ नये म्हणून मास विक्रेते हे शहर बाहेरच आपलं मास विक्रीचा व्यवसाय करत आहे, याउलट शहरातील काही मांस विक्रेते गांधी चौक परिसरातील अमरावती रोडवर स्वतःच्या घरासमोर स्टॉल लावून खुलेआम मांसविक्री करत आहे, त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना घाण व दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे ,सदर मास विक्रेते हे कापलेल्या कोंबडीचे पंख व इतर वेस्ट झालेला मास याच परिसरातील उर्दू शाळेच्या खुल्या परिसरात आणून टाकतात, त्यामुळे या परिसरात राहणारे नागरिक व इतर दुकानदार यांना दुर्गंध चा सामना करावा लागत आहे,व त्यांचे आरोग्यावर देखील याचे विपरीत परिणाम होत आहे, या संदर्भात परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरपालिकेला या अगोदर दोन वेळा निवेदन दिलेले आहे, पण स्थानिक नगरपालिकेने आतापर्यंत ह्या मास विक्रेत्यावर कोणतीही कारवाई केली नाही, आज पुन्हा परिसरातील काही नागरिकांनी यासंदर्भात नगरपालिकेला निवेदन दिले आहे, येणाऱ्या काळात स्थानिक नगरपालिका या मास विक्रेत्यावर कोणती कारवाई करते याची प्रतीक्षा येथील रहिवासी करत आहे, आज निवेदन देतेवेळी प्रकाश चौरे, रूपचंद चौरे, सतीश रामटेके, सोमदत्त इंद्रावणे, सुशील इंद्रावणे, परिसरातील आदी नागरिक हजर होते, बॉक्समध्ये (ऑफिस मध्ये आल्यावर या प्रकरणाची मी माहिती घेतो, येत्या काळात मांसविक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, अमोल माळकर प्रभारी, मुख्याधिकारी नगर पालिका चांदूर रेल्वे)


