मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड दि: १४ मे २०२४ महावितरण प फोन मध्ये घेऊन विजेचे अपडेट आता घरबसल्या मिळणार आहेत. तसेच मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार, पॅन क्रमांक नोंदणी प वर शक्य होणार आहे. याचा लाभ महावितरणचे ग्राहक चुटकीसरशी मिळवू शकतात. यामुळे वीस ग्राहकांनी महावितरणचे प डाऊनलोड करून घ्यावे. असे आवाहन करण्यात आले आहे. वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. यामुळे विजेची जा – ये सतत सुरू आहे. विजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे, ट्रिप होणे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. याचे अपडेट वीज ग्राहकांना मिळावे याकरिता महावितरण प प्रकाशित करण्यात आले आहे. उपकेंद्र व स्थानिक परिसरातील वीज ग्राहकांना महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यावर माहिती देणे अपेक्षित आहे. तसेच वीज पुरवठा खंडित होण्यापूर्वी वीज ग्राहकांना सूचना मिळणे आवश्यक आहे. यासाठी महावितरण कडून ग्राहकांना काही दिवस मेसेजिंग सुविधा पुरविण्यात आली होती. मात्र स्मार्टफोनचा वाढता वापर आणि वीज पुरवठा सुविधा अत्याधुनिक व्हावी यासाठी महावितरण कंपनीने आता महावितरण प काढले आहे. यामुळे ग्राहक क्रमांकाच्या आधारे वीज ग्राहकाला स्थानिक पातळीवरील सूचना देण्यात येत आहे. इतर शुल्काचे ऑनलाइन देय, मोबाईल नंबर, ई – मेल, आधार, टीडीएस आणि पॅन क्रमांक नोंदणी बदल करता येणे शक्य आहे. या प वरून हिंदी भाषेत सेवा मिळत आहे. कारण प्रत्येक वीज ग्राहकाला इंग्रजी भाषा समजलेच असे नसते. ग्राहकाच्या तक्रारी व शंकेचे निरसण या प च्या आधारे करता येणार आहे. यामुळे सर्व वीज ग्राहकांनी महावितरण चे प डाउनलोड करून नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


