रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
तेल्हारा येथील सामाजिक सभागृहामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व लोकजागर मंचच्या वतीने १२ मे ला आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकी मध्ये अकोट मतदार संघातून निवडणूक लढविण्याबाबत तेल्हारा येथून रणशिंग फुंकले असून तशी घोषणा त्यांनी बैठकीमध्ये करून निवड णुकीबाबतचे नियोजन कार्यकर्त्यांना सांगितले.लोक सभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही महिन्यातच आगामी विधान सभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तिविल्या जात असून त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष , लोक जागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आपण मागच्या वेळेस तेल्हारा तालुक्यामध्ये सर्वाधिक मते घेतली होती परंतु अकोट तालुक्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो त्या अनुषंगाने निवडणुकी संदर्भात वेळेवर निर्णय न घेता आतापासूनच आपण निवडणुकी संदर्भात योग्य ते नियोजन करणे आवश्यक असल्यामुळे या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अनिल गावंडे यांनी सांगित ले .आयोजित बैठकीमध्ये त्यांनी बूथ रचनेवर व इतर आवश्यक गोष्टीवर कार्य कर्त्यांनी कसे लक्ष केंद्रित करून काम करावे याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या व आगामी विधानसभेच्या निवडणुकी करिता पदा धिकारी व कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून अकोट मतदार संघातून निवडणूक लढवि णार असल्याचे जाहीर केले त्यांनी निवडणूक लढविण्या ची घोषणा करताच कार्य कर्त्यांनी आपण प्रत्येक गावामध्ये मताधिक्य मिळ विण्याकरिता योग्य ते नियोजन करू असल्याचे सांगितले या आढावा बैठकी मध्ये बूथ रचनेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून निवडणुकीकरिता आवश्यक सर्व गोष्टीचा या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला असून तशा प्रकारच्या नियोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. आयोजित बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकजागर मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा.१० मेला हिवरखेड परिसरा मध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले. अनेक घरांची पडझड झाली, आणि घरांवरील टीन पत्रे उडून गेली, . वादळाला जे जे समोर दिसत होते ते सर्व नेस्तनाबूत करीत गेला. रात्रीची वेळ असल्याने झालेल्या नुकसानीची पूर्णपणे माहिती मिळू शकली नाही परंतु संत्रा, आंबा,केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळ भाजीपाला धान्य व विविध पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानी व्यतिरिक्त अनेक वृक्ष ऊन्मळून पडली. अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले. त्यामुळे शासकीय स्तरावरून तात्काळ पंचनामे करून शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने मदत मिळवून देण्यात येईल याकरिता शासन स्तरावर प्रयत्न कर ण्यात येईल वादळी वाऱ्या मुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात आली असून व त्या दृष्टिकोनातून संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.