कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे वीरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रसारक महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पुजन करण्यात आले . यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. संपूर्ण सोनाळा नगरीतून पालखी मिरवणूक काढून सर्वांनी भजनाचा आनंद घेतला.सर्वांनी पालखी मध्ये श्री महात्मा बसवेश्वर यांच्या नावाचा जयघोष केला. गावातील सर्व वीरशैव लिंगायत समाजाचे पुरुष,महिला यामध्ये सहभागी झाले होते.सम्पूर्ण सोनाळा शहर मध्ये भक्तीमय वातावरण तयार झाले होते. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शेवटी महात्मा श्री बसवेश्वर यांची महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.