भागवत नांदणॆ सर्कल प्रतिनिधी वरवट बकाल
शेगांव: संतनगरी शेगांव जवळच जवळा रोडवर एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश बुधवारी 8 मे रोजी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. शेगाव-जवळा रोडवर एका पेट्रोल पंपामांगे असलेल्या एका घरात देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी मोठ्या चतुराईने त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या खोलीत सागर अनील सारवान याच्यासह कल्याण (जिल्हा ठाणे) येथील 27 वर्षीय पीडीत युवती व मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथील 21 वर्षीय पीडित युवती आढळून आली. या ठिकाणी शहरातील काही व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी मुंबई येथील त्या दोन युवतींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी युवतींची चौकशी केली असता त्यांना कल्याण येथील एका महिलेने शेगांव येथील एका इसमाचा नंबर देऊन देह व्यापारच्या अनुषंगाने बोलणे झाले व ५ मे रोजी त्यांनी शेगाव येथे बोलावून घेतले अशी आपबीती सांगितली. पोलिसांनी घेतलेल्या झडती मध्ये डीलक्स कंपनीचे 3 निरोध किंमत 90 रुपये, 4 हजार 600 रुपये नगदी तसेच चार मोबाईल, बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल किंमत 50 हजार डीलक्स कंपनीची मोटरसायकल किंमत 40 हजार असा एकूण 1 लाख 23 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नामे प्रेम गणेश लहाने (वय 20 रा. जवळा), सुमित सखाराम जाधव (रा. रामदेव बाबा नगर शेगाव), अमोल प्रकाश बांगर (वय 21 रा. पंचाळा ता. संग्रामपूर) यांना ताब्यात घेतले असून एक जण फरार झाला आहे. उपरोक्त आरोपीविरुद्ध कलम 4,5,6, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, सहाय्यक निरीक्षक आशिष चेचरे, ए.एस. आय गजानन माळी यांच्यासह राजेंद्र टेकाळे, गणेश पाटील, विक्रांत इंगळे, चालक विजय मुंडे, टेकाळे आदींनी ही यशस्वी कामगिरी केली.