नागोराव शिंदे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर : तालुक्यातील मौजे कार्ला ,सवणा,मंगरूळ सह सिरजणी फिडर परिसरातील शेतीला मागील ८ ते १० दिवसा पासून लाईट पुरवठा न झाल्यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज दि १४ मे रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपविभागीय कार्यालयावर मुक्या जनावरांना घेऊन असंख्य शेतकऱ्यांनी ह्या परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्या साठी ठिय्या आंदोलन केले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील सात ते आठ दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यातील मौजे कारला , सीरंजनी ,मंगरूळ सह सवणा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील डी.पी. बंद असल्यामुळे येथील मुक्या जनावरांना पाण्यासाठी वन वन घेऊन शेतकऱ्यांना फिरावे लागत आहे या परिसरात विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे येथील मुक्या जनावरांना यन उन्हाळ्यामध्ये एका वेळचे पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना मिळत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज येथील महावितरण कार्यालयास वारंवार लेखी व तोंडी विनंती करून सुद्धा या कार्याकडून या परिसरातील शेतकऱ्यांचा लाईट पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मुक्या जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे दिनांक १४ मे रोजी संतप्त शेतकऱ्यांनी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयास अगोदर लेखी निवेदन देऊन दिनांक १४ मे रोजी सकाळी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आप आपले जनावरे महावितरण कार्यालयात आणून सोडले व तात्काळ आमच्या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला यावेळी शेतकरी शरद चायल,बालाजी ढोणे,लक्ष्मण ढोणे,सुभाष ढोणे, अंगत सुरोषे, बाळू गायके, शाम बस्टेवाड,राजू जैस्वाल , अमोल गायके सह असंख्य शेतकऱ्यांनी आप आपल्या जनावरा सह उपस्थिती लावली होती.


