दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 14: घराबाहेर पडलेले दिसून आलेत. काही कारणाने बाहेर गावी गेलेल्या मतदारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी १२ ते ३ दरम्यान मतदान केंद्रावर गर्दी कमी झाली होती. मात्र उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर चार वाजेनंतर मतदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली. 71.49 टक्के मतदान झाल्याने बुथवरची लढाई रंगतदार बनलेली दिसून आली आहे. शहादा शहरातील नगर पालिका शाळा क्रमांक ९ व १६, म्युनिसिपल हायस्कूल, व्हालंटरी शाळा, लाडकोरबाई शाळा, निशात स्कूल, नाईक हायस्कूल, शारदा कन्या विद्यालय आदि मतदान केंद्रांवर सकाळपासूनच जोरदार रांगा लागलेल्या दिसून आल्या. या केंद्रांवर मतदारांशी संवाद साधला असता भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांतच खरी लढत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या डॉ. हिना विजयकुमार गावित निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे युवा उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व की आरक्षण, संविधान रक्षण यावर आधारित परिवर्तनाचा नारा देणारे नेतृत्व या मुद्द्द्यावर प्रचार काही दिवसापासून रंगला होता. शहादा तालुका व विधानसभा मतदारसंघात आ.राजेश पाडवी, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपकभाई पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा. मकरंद पाटील, माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी तर काँग्रेसकडून जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, माजी कृषी सभापती अभिजीत पाटील, माजी आमदार उदेसिंग पाडवी, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, कॉ. ईश्वर पाटील आदिंनी प्रचार केला. आज विविध मतदान केंद्रावर हे प्रमुख नेते व त्यांचे कार्यकर्ते दिवसभर उपस्थित होते. प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ताजी पवार, तहसीलदार दीपक गिरासे, पोलिस निरीक्षक शिवाजीराव बुधवंत यांनी विविध मतदार केंद्रांवर भेट दिली.


