रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
मराठी संस्कृतीतील पवित्र सण अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर सकाळी सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला परंतु त्याच दिवशी म्हणजे दि 10 मे शुक्रवार रोजी रात्री तुफानी वादळाने हिवरखेड सह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपुर नया खेडा, उंबर शेवडी, कार्ला यासह अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. ज्यामध्ये शेकडो एकरावरील पपई व केळीच्या लदबदलेल्या फळबागा भुईसपाट. त्यामुळे शेतकऱ्यां च्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्याचे दुर्दैवी चित्र हिवरखेड सह विविध गावामध्ये आहे.शुक्रवारी अवकाळी वारा उधाणाने, तुफानी वादळाच्या स्वरूपात हिवरखेड परिसरात धाव घेतली अवकाळी फक्त पावसाच्या स्वरूपात न येता प्रचंड वारा उधान, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आकाशा तील काळोख, वावटी, अशी अनेक संकटे सोबत घेऊन आला. वादळाची तीव्रता इतकी होती की रस्त्यावर मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले. अनेक घरांची पडझड झाली, आणि घरांवरील टीन पत्रे उडून गेली, घरांवरील टीन पत्रे इतक्या जोमाने धडधडत होती की लहान मुलांनाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वादळाला जे जे समोर दिसत होते ते सर्व नेस्तनाबूत करीत गेला. रात्रीची वेळ असल्याने झालेल्या नुकसानीची पूर्ण पणे माहिती मिळू शकली नाही परंतु संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी, अशा कित्येक फळ भाजीपाला धान्य व विविध पिकांचे नुकसान झाले आहे.केळीची झाडे शेतात कोलमडून पडली त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी प्रदीप पाटील व इतर शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.पिकां च्या नुकसानी व्यतिरिक्तअनेक वृक्ष ऊन्मळून पडली. अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले. त्यामुळे शासकीय स्तरावरून तात्काळ पंचनामे करून मदत मिळणे अपेक्षित आहे.विद्युत खांब कोसळले, महावितरणची बत्ती गुल.अक्षय तृतीयेला आलेल्या प्रचंड तुफानी वारा उधाणाने अनेक वृक्ष म्हणून पडली, अनेक गावातील विद्युत खांब कोसळले, त्यामुळे महावित रण ची बत्ती गुल्ल होऊन सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. आधीच तप्त उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नेहमी प्रमाणे पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक तास महावितरण ची गुल्ल झालेली बत्ती परत कधी येणार याची वाट नागरिक बघत होते.