शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
भारतरत्न सहकारिता सन्मान – 2024. सेलूतील साईबाबा बँकेला सर्वोत्कृष्ट संचालकासह दोन पुरस्कार. सेलू : सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेला भारतरत्न सहकारिता सन्मान 2024 अंतर्गत बेस्ट डायरेक्टर ऑफ द ईअर आणि बेस्ट डिजिटल पेमेंट इनीशेटिव्ह, असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. अध्यक्ष हेमंतराव आढळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी ही माहिती दिली.भारत को ऑपरेटिव्ह बँक मुंबई या संस्थेच्यावतीने साईबाबा बँकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दि. 22 मे रोजी मुंबई येथील हॉटेल ललित येथे आयोजीत सभारंभात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, असे लाडाने साहेबांनी सांगितले आहे. दरम्यान पुरस्काराबद्दल अध्यक्ष हेमंतराव आढळकर आणि साईबाबा बँक संचालक मंडळ,अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विवीध क्षेत्रातील मान्यवरां कडून अभिनंदन आणी कौतुक होत आहे.


