अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी शहरात मागील काही दिवसा पासून गुप्तधन काढन्याचे प्रमाण वाढले होते. अश्यात दि.१०/०५/२०२४ रोजी चे अक्षयचतुरतिचे मोहर्तावर काही लोक गुप्तधन काढत आहे अशी माहिती बिटरगाव पोलिसांनी लागली वरून ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामीलावाड यांचे शेतात छापा टाकून जीवन गोविंद जाधव वय २५ वर्षे रा. टेंभुरदरा, संतोष हरीसिंग राठोड वय ४८वर्षे रा बाळदी, अभिजीत गणेश मामीडवार वय २५ वर्षे रा ढाणकी , सर्वजीत कांनबा गंगनपाड वय २५ वर्ष ढाणकी, पंडित विश्वनाथ राठोड वय ४५ वर्ष रा चिल्ली. सर्व ता. उमरखेड जि यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून पाच मोबाईल एकूण किंमत २८०००/- व तीन मोटरसायकल किंमत-१२०००० /- , डीप सर्च मेटल डिटेक्टर किंमत ६००००/- व एक थापीच्या आकाराचा चाकू किंमत ५०० /- रुपये असा एकूण२०८५०० /-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरून दत्ता कुसराम यांचे फिर्याद वरून वरील आरोपी विरुद्ध अपराध न.१८४/२४ कलम ३(२)३(३) महाराष्ट्री नरबळी आणि इतर अमानुष्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम२०१३ प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला सदर ची कारवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रेमकुमार केदार, पोहेका रवी गिते, पोलीस नायक गजानन खरात,पोका, निलेश भालेराव, अंबादास गारुळे, प्रवीण जाधव, प्रकाश मुंढे, चालक मंगेश हुलगुंडे यांनी केली पुढील तपास वरिष्ठयांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय साळुंके पोलीस स्टेशन उमरखेड करत आहेत


