दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 09: लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांना मत देण्याकरिता दिव्यांग व ८५ वयोगटावरील वृद्ध नागरिकांना मतदान करता यावे म्हणून निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करून घरबसल्या मतदान करण्याची सुविधा मतदान कर्मचारी नेमून करण्यात केली आहे. त्या अनुषंगाने शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील वयोवृद्ध जानीबेन सखाराम पाटील वय 98 वर्षे यांनी घरबसल्या उत्स्फूर्तपणे मतदान केले. दिव्यांग व ८५ वयोगटावरील वृद्ध नागरिकांना मतदान करता यावे म्हणून निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करून घरबसल्या मतदान करण्याची सुविधा मतदान कर्मचारी नेमून करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा अंतर्गत शहादा विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षे वयोगटावरील नागरिकांना व दिव्यांग व्यक्तींना घरी बसून मतदान करण्याकरता बीएलओ यांनी संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या माहितीवरून पहिली फेरी दि. 08 व 09 मे रोजी होत असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, शहादा यांच्या मार्फत फिरते पथक तयार करून पथकांमार्फत पात्र मतदारांचे गृहमतदान घेतले जात आहे. जर कोणी मतदार यावेळी घरी न आढळल्यास १० व ११ मे रोजी दुसऱ्या फेरीत त्यांचे मतदान घेतले जाणार आहे. या अंतर्गत शहादा विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षे वयोगटावरील 3242 पैकी 142 वृद्ध व 1532 पैकी 38 दिव्यांग मतदान करणार आहेत. याचे एक उदाहरण म्हणून शहादा-तळोदा विधानसभ अंतर्गत येणाऱ्या शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील वयोवृद्ध जानीबेन सखाराम पाटील वय 98 वर्षे यांचे मतदान याच पद्धतीने घरी जाऊन घेण्यात आले. त्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे यात आपले मतदान नियोजित मतदान दि. १३ मेच्या अगोदर घरी बसून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी नियुक्ती पथकातील अधिकारी, कर्मचारी तसेच गाव लेव्हलवर तलाठी आदी उपस्थित होते. वयोवृद्धांनी केलेले मतदान इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


