सिध्दोधन घाटे जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि.३० एप्रिल २०२४ बीड जिल्हा लोकसभा निवडणुक रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताच जिल्ह्यातील प्रस्थापितांना धडकी भरली असल्याचे मत जिल्ह्यातील सामान्य जनतेतून येत आहे. जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून जिल्ह्यातील प्रस्थापीत नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येकजण आपली प्राणप्रतिष्ठा पणाला लावून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत.बीड जिल्ह्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र वेगळेच चित्र पहायला मिळते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील प्रस्थापितांना आणि घराणेशाहीला फाटा देण्याचा निर्धार जनतेने केल्याचे मत जिल्ह्याभरातील सामान्य जनतेतून येत आहे. जिल्ह्यातील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेल्या नेत्यांना यावेळी जनतेने निर्धार केला आहे. दरम्यान ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताच जिल्ह्यातील राजकारणात मोठी ढवळाढवळ झाली असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या उमेदवारी अर्ज चर्चा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात सुरू आहे. अशोक हिंगे यांनी तळागाळातील बहुजन समाजासाठी केलेले कार्य आणि मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून केलेल्या कार्याची पोचपावती बीड जिल्ह्यातील जनता देणार असल्याचे मत जनतेतून येत आहे. जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि राजकारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या उमेदवारी अर्जाने ढवळावे असून याचा फटका जिल्ह्यातील प्रस्थापितांना नक्कीच बसणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील प्रस्थापितांना आणि घराणेशाहीला वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या उमेदवारी अर्जाने धडकी भरली असल्याचे मत जिल्ह्यातील सामान्य जनतेतून येत आहे.