गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- नांदुरा येथील सायकल मित्र ग्रुपचे अमर फाटे, दीपक फाळके,संदीप पिवळतकर, सुरज दराडे,ज्ञानेश्वर इंगळे पेशाने शिक्षक असलेले असे एकूण पाच सायकल वीर शिक्षक पर्यावरण एज्युकेशन फॉर एवरी चाइल्ड व एम्पावरिंग वुमन अँड गर्ल्स एज्युकेशन असा मौलिक संदेश देत ७ मे २०२४ रोजी सकाळी ५ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्या ला अभिवादन करून कन्याकुमारी सायकल यात्रेला निघाले.नांदुरा ते कन्याकुमारी असा २५०० किलोमीटरचा ते तब्बल २२ दिवस सायकल प्रवास करणार आहेत, नांदुरा शहरातून कदाचित इतका लांब आणि मोठा हा पहिलाच सायकल प्रवास असेल.या प्रवासात ते दररोज शंभर ते दीडशे किमी सायकलिंग करणार आहेत.यामध्ये नांदुरा, अजिंठा,वेरूळ, औरंगाबाद,पैठण, सोलापूर, विजयपूर, बेंगलोर, म्हैसूर, उटी, मुन्नार, मदुराई, रामेश्वराम, धनुष्यकोडी, कन्याकुमारी असा संपूर्ण दक्षिण भारतचा सायकल प्रवास असणार आहे.त्यासाठी त्यांनी संपूर्ण तयारी केली असून सर्व मार्गदर्शन घेतले आहे.सायकल यात्रेच्या पूर्वसंध्येला ६ मे रोजी संध्याकाळी कोठारी शाळेमध्ये नांदुरा सायकल मित्र ग्रुप तर्फे या सायकल विरांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाचही सायकलपटूंचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी बुलढाणा येथील आंतरराष्ट्रीय सायकलपटू संजय जी मयुरे सर यांनी उपस्थित राहून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या,नंतर नांदुरा परिसरातील सर्व सायकल प्रेमींनी शहरातून सायकल रॅली काढत या सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या.यावेळी कोठारी शाळेचे अध्यक्ष विठ्ठल शेठ कोठारी,श्री काळवीट सर,वामन फंड,प्रेम जैन,जगदीश आगरकर,अशोक घनोकार,विश्वास मापारी,गिरीश चांडक,डॉ संदीप डवंगे,डॉ राजेंद्र गोठी,डॉ शरद पाटील,विजय डवगे, जयेश मिहाणी, ईश्वर जाणवाणी,अनिल घनोकार,प्रा अवचार सर,देशमुख सर, काकडे सर,लक्ष्मण वक्ते तसेच अनेक सायकल प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.


