शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक महाराणा प्रताप यांचे कार्य अलौकिक – अँड.मनोज संकाये
मोहन चव्हाण उपजिल्हा प्रतिनिधी बीड
बीड/परळी दि:०९ मे २०२४रजपूत समाजाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे शौर्य वीर आणि आपल्या मातीप्रती स्वाभिमान बाळगणारे मेवाड सुपुत्र वीर श्री महाराणा प्रताप यांची ४८४ वी जयंती येथील हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप यांची युद्धनीती सर्व परिचित असून त्यांनी युद्धनीतीच्या जोरावर शत्रूला सळो की पळो करून युद्ध जिंकण्यात यांचा हातकंठा होता. शौर्य वीरता आणि स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांनी केले. परळी येथील सिंचन भवन परिसरातील अंबाजोगाई रोडवर श्री महाराणा प्रताप चौक येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक काबरे सर यांनी केले. यावेळी चंदूसिंग काबरे, मोहन चव्हाण (पत्रकार), राज काबरे, साहेबराव चव्हाण, अशोक चव्हाण, नितीन चव्हाण, नवनाथ चव्हाण,हिम्मत चव्हाण, राम सोळंके, सोमनाथ पवार, सुधीर पवार, राजेश सोळंके, अक्षय पवार, पृथ्वीराज चव्हाण, अजय चव्हाण, अनिल राजपूत, सुंदर आव्हाड, गोविंद कांदे, भगवान नागरगोजे, संदीप चौधरी, संतोष कांबळे, देविदास मुंडे व इतर असंख्य समाज बांधव व मित्र मंडळ उपस्थित होते.