परवेज खान तालुका प्रतिनिधी केळापूर
पांढरकवडा येथील नगरपरिषद मधील मलईदार कामे हे नेहमी प्रस्तापितांच्या घशात जात आहे .नगरपरिषद मध्ये निघणाऱ्या अनेक निविदा हे बेरोजगार युवकांपर्यंत पोहचत नाही आहे .त्या मूळे अनेक बेरोजगार युवकांना नगरपरिषद मधील निविदा ,कामे, यांची माहितीच मिळत नाही. आणि ती निविदा बांधकामविभागातील नवीन कामे ह्या सर्व बाबी हेतूपरस्पर गोपनीयता बाळगून फक्त आणि फक्त प्रस्थापितांच्या घश्यात ओतण्यात येत आहे .नगरपरिषद कार्यालयात कुठेही नवीन कामाविषयी ..निविदा.. माहिती.. नोटीस बोर्ड वरती दिसत नाही.. आणि जर का एखाद्या बेरोजगार युवकाने बांधकाम विभागातील काम घेऊन काम जरी केले तर त्याचे हेतू परस्पर देयके थांबवून त्यांना मानसिक त्रास सुद्धा देण्यात येतो. जेणेकरून बेरोजगार युवक पुन्हा नगरपरिषदेचे काम करूच नये. देयके काढण्यासाठी पर्सेंटेज दिल्याशिवाय देयके निघत नाही.. त्या मूळे नगरपरिषदेत नवीन कामाची माहिती.. निविदा सर्व जनतेपर्यंत पोहचतील व कार्यालयात दर्शनी भागी सर्व माहिती लावावी अशी मागणी बेरोजगार युवक करीत आहे .