शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.08 सेलू येथील ज्येष्ठ नागरीक हाफेज मोहम्मद अफजल यांचे बुधवारी (दि.08) सकाळी 10.30 च्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 67 वर्षांचे होते. दरम्यान, त्यांच्या पार्थीवावर सायंकाळी ईदगाह कब्रस्थानात दफनविधी होणार आहे. हाफेज मोहम्मद अफजल हे रेल्वे स्थानकासमोरील मदीना मस्जिद येथे शाही इमाम होते. विशेषतः ते ईदजी नमाज पठण करत असत. शाही इमाम म्हणून मदीना मस्जिद सेलूत 25 वर्ष नमाज पठणाचे काम त्यांनी केले. दारुल उलमची स्थापना करीत त्यांनी सेलू व सेलू परिसरात अनेक विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण देत विद्यार्थी घडविण्याचे काम अखंडपणे केले.दरम्यान, त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सेलू येथील पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मोहम्मद इलियास यांचे ते वडील होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)