देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी, हसनाबाद
हसनाबाद : १८ जालना लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांना मत देण्याकरिता दिव्यांग व ८५ वयोगटा वरील वृद्ध नागरिकांना मतदान करता यावे म्हणून निवडणूक आयोगाने त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करून घरबसल्या मतदान करण्याची सुविधा मतदान कर्मचारी नेमून करण्यात आलेली आहे.या अंतर्गत१०२ बदनापूर विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांना व दिव्यांग व्यक्तींना घरी बसून मतदान करण्याकरता बीएलओ यांनी संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे पाठवलेल्या माहितीवरून आठ मे व नऊ मे रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बदनापूर यांच्या मार्फत फिरते पथक तयार करून पथकांमार्फत यासाठी पात्र मतदारांचे मतदान घेतले जात आहे. याचे एक उदाहरण म्हणून भोकरदन तालुक्यातील बदनापूर विधानसभा अंतर्गत येणाऱ्या हसनाबाद येथील वयोवृद्ध सुलोचनाबाई दिगंबरराव तांबट वय ९६ वर्षे यांचे मतदान याच पद्धतीने घरी जाऊन घेण्यात आले असून,त्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे यात आपले मतदान नियोजित मतदान दिनांक १३ मे च्या अगोदर घरी बसून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.यावेळी नियुक्ती पथकात क्षेत्रीय मतदान अधिकारी बी जी अंधारे,मतदान केंद्र अध्यक्ष आण्णा इंगळे,सूक्ष्म निरीक्षक आशिष पवार,सहाय्यक केंद्र अध्यक्ष बी एल जगदाळे,व्हिडिओ ग्राफर सचिन गिरी,महिला पोलीस कॉन्स्टेबल एम एन नागलोत यांचा पथकात समावेश होता.त्यांना सहाय्यक म्हणून गाव लेव्हलवर तलाठी गणेश गायकवाड,बीएलओ भास्कर पठाडे,अंगणवाडी सेविका छाया वैष्णव,अरुणा कुलकर्णी,उषा तंगे, ऋषिगंगा मैंद, द्रौपदाबाई मानकापे,सुनीता सोनवणे यांनी सहाय्य केले.या पथकांनी खंडाळा,शिरसगाव मंडप,निमगाव,रजाळा,हसनाबाद,एकेफळ,खडकवाडी अशा गावातील नागरिकांकडून मतदान करून घेतले.यात १५ पैकी एक मयत,एक बाहेरगावी शहरात दवाखान्यासाठी स्थलांतरित झाले असल्याने १३ मतदान झाल्याचे माहिती पथकातील अधिकारी यांनी दिली आहे.हसनाबाद येथे तीन प्रभाग असून संबंधित बीएलओ यांनी दिलेल्या माहितीनुसार बदनापूर विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक ५९ मध्ये ९,६० मधील ८,६१ मध्ये ३३ तर ६२ मध्ये १४ मतदारांचा समावेश होता,परंतु अनेक लाभार्थ्यांनी आपले घरी बसून मतदान करून घ्यावी म्हणून फॉर्म भरून दिलेले होते परंतु हसनाबाद येथील यात फक्त एकाच महिलेचे नाव आल्यामुळे एकच मतदान घेण्यात आले.बाकी दिव्यांग व वृद्ध मतदारांविषयी निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे ८५ प्लस वृद्धांचे व दिव्यांगाचे मतदान न झाल्यामुळे निवडणूक यंत्रणेवर संताप व्यक्त करून हा विषय सर्वत्र चर्चेत होता.या प्रकाराकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.