अविनाश पोहरे ब्युरो चिफ, अकोला
पातुर : 24 मार्च जागतिक क्षय रोग दिवस निमित्त तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.यामध्ये जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांनी विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधून त्यांना क्षयरोग बाबत माहिती दिली त्यानिमित्त विद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि राष्ट्रीय नॅशनल कॅडेट क्रॉप यांच्यातर्फे पातुर मध्ये क्षयरोग आणि त्यापासून बचाव कशाप्रकारे करता येईल याबाबत जनजागृती म्हणून रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनीष शर्मा यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोगाबाबत माहिती देताना सांगितले की, फुफुसांचा क्षयरोग असणाऱ्या सहवासितांना टीबी न होण्याकरिता टि पी टी प्रतिबंधात्मक औषधोपचार, निक्षय पोषण योजना यामध्ये प्रत्येक रुग्णाला उपचार पूर्ण होईपर्यंत प्रति महा 500 रुपये इतके अनुदान निक्षय पोषण योजनेअंतर्गत पोषण आहाराकरिता रुग्णांना मिळणार, क्षय रोगी यांना कमीत कमी सहा महिने ते तीन वर्ष कोरडा आहार (अन्नाची टोपली) निश्चय मित्राद्वारे पोहोचवली जाईल. सोबतच सतत खोकला राहत असेल तर ताबडतोब संपर्क डॉक्टर सोबत साधावा.निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निहारिका कांबळे द्वितीय क्रमांक निशा वाढोकार तृतीय क्रमांक मयुरी यांना मिळाला रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्नेहल काळपांडे, जया केंद्रे द्वितीय क्रमांक साक्षी वसतकार, मयुरी गोपनारायण आणि तृतीय क्रमांक मोदीचा गवई या विद्यार्थ्यांना मिळाला. आरोग्य विभागातर्फे चालता बोलता कार्यक्रम आठवडी बाजार मध्ये घेण्यात आला.क्षय रोग दुरीकरण कार्यक्रम रॅली ही तुळसाबाई कावल विद्यालया मधून -खानापूर रोड मार्गे -जैन मंदिर- मुक्ताराम नगर आणि परत तुळसाबाई काल विद्यालय मध्ये रॅलीचा समारोप विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करून करण्यात आली.याप्रसंगी तुळसाबाई कावल विद्यालयाचे प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत उपप्राचार्य एस बी चव्हाण उप मुख्याध्यापिका आर एस धेंगे ,पर्यवेक्षिका पी एम कारस्कर, जगमोहन सिंह गहीलोत उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता वसंत उन्हाळे पीपीएम, डॉक्टर गणेश लोखंडे वैद्यकीय अधिकारी, नितीन थुटे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, राजेश शिंदे आरोग्य सहाय्यक, गजानन अवचार आरोग्य सहाय्यक, शालिग्राम दराडे, सांगळे आरोग्य सेवक उपस्थित होते.