प्रकाश कांबरे तालुका प्रतिनिधी हातकणंगले
हातकणंगले : इचलकरंजी येथुन धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करणेसाठी धर्मेद्र तुरहा वय वर्ष २६ रा. मुळगाव आत्मज जुडी तुरहा योगेद्र गिरी इब्रासनमाबाद उपरवार बलिया उत्तरप्रदेश सध्या रा.कबनुर इचलरंजी ता हातकणंगले, जि. कोल्हापूर हा मौजे वडगांव येथे त्याचे मित्र परिवारा- कडे आला होता त्यावेळी रंगपंचमी खेळत असताना किसन माळी यांचे शेतातील विहीरीच्या काटावरुन अचानक पाय घसरुन विहरीत पडला व पोहता येत नसल्याने विहीरीच्या पाण्यात त्याचा बुडुन मृत्यु झाला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रंगपंचमी खेळत असताना सकाळी १०.वा सदरची घटना घडली. एकमेकांना रंग लावणेसाठी शेतात पाठलाग करून खेळत होते. खेळत असताना त्यातील दोघे विहीरीत पडले पैकी एकाला थोडेफार पोहता येत असल्याने त्याने आरडा – ओरडा केला त्यामुळे तेथे असलेल्या त्यांच्या अन्य मित्रांनी एकाला वर काढले व दुसरा अजिबात पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. गावातील दतात्रय कांबळे यांनी दोन -चार वेळा पाण्यात बुडून शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही. शेवटी त्याने कोल्हापूर शुक्रवार येथील निंबाळकर नामक त्याच्या पाणबुड्या मित्राला बोलावले व त्याने साधारण २.४५ वा.त्याला विहीरीच्या पाण्यातुन त्याला शोधून बाहेर काढले.११ एप्रिल २०२४ रोजी त्याचे लग्न होते पण नविन संसार सुरू करण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला.या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेत झाली असुन याबाबत राजाराम तुरहा व्यवसाय खाजगी नोकरी रा मुळगाव दिघार जि बलिया राज्य उत्तर प्रदेश सध्या रा मौजे वडगाव ता हातकणंगले यांनी दिली आहे.सदरची घटना दि.२५ मार्च रोजी सकाळी १० चे सुमारास घडली आहे.पुढील तपास शिरोली एमआयडीसी सपोनि पंकज गिरी याचे मार्गदर्शना- खाली पो.ना. देसाई व पो.हे.कॉ.चौरे करत आहेत.