दिनेश झाडे चिफ ब्युरो विदर्भ
भद्रावती:-चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा उमेदवारीचा अनेक दिवसांपासूनचा तिढा आज सुटला आमदार प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची जाहीर करण्यात आली. आहे. भारतीय जनता पक्षाने १३ मार्च रोजी जाहीर केलेल्या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांचे तिकीट कापुन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र महाविकास आघाडी घटक पक्षाला म्हणजेच काॅंग्रेस पक्षाला अद्यापही उमेदवारी जाहीर करता आली नव्हती. यानंतर चंद्रपूर येथील गांधी चौकात त्यांच्या स्वागत सभेचे आयोजन करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व मंदिरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात आल्या आणि भाजप कार्यकर्ते सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचार कामात व्यस्त होवून जोमाने कामाला लागले आहेत. मात्र या लोकसभेसाठी काॅंग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर न केल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यामधे संभ्रमाची स्थित निर्माण झाली होती. ती आज दुर झाली आहे. केंद्रीय पक्षश्रेष्ठिंनी आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे संभ्रमात असलेले कार्यकर्ते फटाके फोडून आनंद साजरा करतांना दिसत आहे.