अमोल सावंत तालुका प्रतिनिधी केज
केज दि.25 तालुक्याचे भूमिपुत्र तथा सेवानिवृत्त आदर्श शिक्षक,आदर्श व्यक्तिमत्व विष्णू बचुटे यांची भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश मोर्चाच्या केज तालुकाध्यक्ष पदी विष्णू बचुटे यांची संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी नियुक्ती पत्र देऊन नुकतीच निवड केली आहे. भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश मोर्चा हा भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार,अन्याय,अत्याचार विरोधी लढा देणारी ही राज्यव्यापी सामाजिक संघटना आहे.केज तालुक्यातील अन्याय,अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील समविचारी मंडळींनी एकत्र घेऊन देश हितार्थ,जन हितार्थ काम करण्याची जबाबदारी विष्णू बचुटे यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मित्रपरिवार,नातेवाईक, व सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.