नाजुकराव खंडारे तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच काही दिवसांपूर्वी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे हा लोकशाहीचा पर्यायाने राज्यघटनेचा महत्त्वाचा भाग आहे असे असले तरी आचार संहिता लागू होताच मुर्तिजापूर शहरातील व तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या खुर्चीवर कोणी दिसून येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्न निर्माण केला जात आहे की आचार संहिता लागू होणे म्हणजे शासकीय कार्यालये बंद असणे होय का ? आचार संहिता लागू करण्यात आली तेव्हापासून मुर्तिजापूर तालुक्यातील व शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अगदी शुकशुकाट दिसून येत आहे सामान्य नागरिक विविध कामांसाठी तहसील , पंचायत समिती तथा विविध कार्यालये येथे जात आहेत परंतु साहेब इलेक्शन ड्युटी वर आहेत असे सांगितले जाते आणि नेमके अधिकारीच निवडणुक कार्यक्रम असल्याने उर्वरित कर्मचारी कार्यालयाला दांडी मारताना दिसुन येत आहे परिणामी सर्व सामान्य नागरिकांची कामे ठप्प पडली आहे जिल्हाधिकारी अकोला यांनी यांनी या ग़ंभीर बाबींकडे लक्ष देवुन आचार संहिता व सोबतच नागरिकांचे कामे याकडे लक्ष देवुन योग्य ते नियोजन करावे आणि प्रशासन मजबूत करण्यासाठी कार्य करावे अशी मागणी सामान्य स्तरातून होत आहे. मुर्तिजापूर तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय, बांधकाम विभाग, घरकुल योजना विभाग , रोजगार हमी योजना विभाग ही सर्व विभाग आचार संहिता लागू झाल्या पासून ब़ंदच असल्याने सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे नव्हे तर जनु आचार संहिता मुळे शासकीय कार्यालये बंद चे असतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा जिल्हा अधिकारी अकोला यांनी आचार संहिता व सामान्य नागरिक यांच्या कामांचा समन्वय साधून प्रशासन मजबूत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी सामान्य स्तरातून होत आहे.