गजानन वानोळे, ग्रामीण प्रतिनिधी किनवट
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड मार्फत आयोजित जिल्ह्यातील किनवट तालुक्यांत रतनीबाई राठोड प्राथमिक शाळा येथे “माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृध्दी “तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. सदरील शिबीर हे दि.२१-०३-२०२४ ते २३-०३-२०२४ या कालावधीत गट शिक्षण कार्यालय किनवट चे गट शिक्षणधिकारी श्री. ज्ञानोबा बने साहेब यांच्या मार्गदर्शनात यशस्वी पार पडले. यावेळी तालुक्यातील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमास श्री.हामदे सर, श्री.काळे एस. एच सर, श्री.नकुले के. ए. सर यांनी साधन व्यक्ती म्हणून कार्य केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गट शिक्षणधिकारी श्री. डी. बने यांच्या सह संजय कांबळे, मुरगुलवार सर, नन्नावरे सर, बोलेनवार सर, इंदूरवार बि.आर.आदींनी परिश्रम घेतले. यात राष्ट्रिय शैक्षणिक धोरण – 2020 ची प्रमूख वैशिष्ट्ये, राष्ट्रिय अभ्यासक्रम आराखडा, नावीन्यपूर्ण अध्यापन शास्त्र, 21व्या शतकातील कौशल्ये व भविष्यवेधी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व समुदेशन, कुमारावस्थेतील मुले समजून घेतांना, शाळा आधारित व क्षमता आधारित मूल्यांकन, संशोधन कार्य पद्धती , माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग आणि प्रभावी शैक्षणिक नेतृत्व आदी मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. चौकट:-याचं निमित्ताने गटशिक्षणाधिकारी किनवट श्री. ज्ञानोबा बने साहेब यांनी एक भारताचा जागरूक नागरीक म्हणून लोकशाहीच्या सर्वात मोठया उत्सवात म्हणजेच लोकसभा निवडणुकीत सर्वांनी सहभागी तर व्हावेच पण आपल्या परिसरातील किमान पाच लोकांना या बद्दल जागरूक करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी शिक्षकांना करण्यात आले.


