पिकांना फटका : पाणी पिल्याने जनावरांनाही येत आहे भोवळ
अनिस सुरैय्या तालुका प्रतिनिधि महागांव
महागांव: तालुक्यातील सवना लगत असलेल्या साखर कारखान्यातून निघणाऱ्या पेंट वॉश केमिकल (अधरपूस प्रकल्प) वेणी धरणाच्या कालव्यात सोडल्या आहे. त्यामुळे कालव्यासमोरील गावांना आणि कालव्यामधील जीवांना धोका निर्माण झाला आहे. या केमिकलमुळे नवीनच संकट निर्माण झाले आहे.बऱ्याच महिन्यापासून हा प्रकार सुरू असून पाण्यातील दुर्गंधी आणि सदर कालव्यातील पाण्याचा प्रवाह बंद झाल्यानंतर जळालेले गवत या संबंधित घडलेल्या केमिकलच्या प्रादुर्भावा नंतरचे स्पष्ट दिसून येत आहेत. या कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कारखान्याच्या विरोधात आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. महागाव तालुक्यातिल सवना परिसर हा सुपीक आणि ओलीत शेतीमालासाठी पूरक असलेला परिसर म्हणून ओळखल्या जातो. सवना, खडका, आंबोडा आणि वाघनाथ, हिवरा गावापर्यंत या कालव्याचे पाणी पिकांसाठी वापरले जातात. या पाण्यात केमिकल मिसळल्यामुळे संबंधीत गावातील लोंकांना व जनावरांना तसेच शेती धोक्यात आली आहे. परिणामतः सर्व पिके जळालेली आणि करपलेली दिसून येत आहेत. कालव्या लगत असलेल्या विहिरींचे पाणी दूषित होत आहे. विहिरीमधील जीव जंतूंचे आणि कालव्यात असलेल्या माशांचे तडफडून मृत्यू झाल्याचे दिसत असून संबंधित विभागाने या कारखान्याच्या गैर कृत्याकडे लक्ष देऊन हा कारखाना आणि हा केमिकल कालव्यात सोडणाऱ्या कारखानदाराच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून निर्बंध आणण्यात यावे अशी मागणी कालव्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे.


