अमोल सावंत तालुका प्रतिनिधी केज
केज दि. 24 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाअंतर्गत किसान सेलच्या बीड जिल्हा अध्यक्ष (अंबाजोगाई विभाग) पदी सी बी एस ईनामदार यांची निवड करण्यात आली.कु. पूजा अशोक मोरे प्रदेशाध्यक्ष किसान सेल महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते जावक क्रमांक 07/अध्यक्ष /एनसीपी/ किसान/मार्च/2024 या पत्राद्वारे सीबीएस इनामदार यांना बीड जिल्हा (अंबाजोगाई विभाग )अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सीबीएस इनामदार यांची कार्यपद्धती पाहता शेतकऱ्या विषयी अस्मिता पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी विश्वास ठेवत नवीन गुलाबाचे फुल उमलत आहे हे जाणून अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ग्रामीण भागात शेतकऱ्या विषयी तळमळ असणारा व्यक्ती म्हणजे इनामदार साहेब त्यांनी शासनाला सडेतोड प्रश्न विचारून शेतकऱ्याला मिळणारा अनुदान स्वामीनाथन आयोगा विषयी माहिती तीनपट मिळावी यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाकडे मागणी धरून वेळोवेळी पाठपुरावा केला. ग्रामपंचायत मार्फत धरणे आंदोलन तहसील कार्यालय निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा काम सीबीएस इनामदार यांनी केला आहे म्हणून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा पाहता या पदावर त्यांना विराजमान करण्यात येत आहे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


