शरद भेंडे तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट: लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीरतेने घेत उपविभागातील गुंड प्रवृत्तीच्या तीन व्यक्तींना जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणूक शांततेत राहावी कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस प्रशासनाने सराईत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीची माहिती गोळा केली आहे.अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन तेल्हारा हद्दीतील नितीन गजानन आमझरे (रा.आडसुळ ता. तेल्हारा) अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अब्दुल सुलतान अब्दुल इरफान (रा.अकबरी प्लॉट.)अकोट ग्रामीण पोलीस हद्दीतील संतोष दिनकर काळे (रा. वडाली देशमुख)यांना पुढील सहा महिन्यातपर्यंत अकोला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या प्रस्तावावर तडीपार करण्याचा आदेश मुबई पोलीस अधिनियम १९५१कलम ५६ (अ) (ब) अन्वये अकोट उपविभागीय यांनी काढला दंडाधिकारी यांनी काढला दरम्यान अकोला जिल्हात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून शांतता राहावी या करिता अशा प्रकारे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमाननारे सराईत गुन्हेगारांवर येणाऱ्या आगामी सन.उत्सव काळात एमपीडिए व प्रचलित कायद्यंवये कार्यवाही करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह तसेच उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी दिला.तडीपार करण्यात आलेले व्यक्ती अकोला जिल्ह्याच्या हद्दीत निदर्शनास आल्यास डायल ११२ तसेच जवळील पोलीस स्टेशन किंव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अकोट येथे माहिती द्यावी.-अनमोल मित्तल, सहाय्यक पोलीस अधीक्षक.उपविभाग अकोट.