अजिंक्य मेडशीकर तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर येथे दिनांक 22 मार्च रोजी वर्ग पहिली ते सहावीचे विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक उल्हासराव मेडशीकर हे होते.तर कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी प्रदीप तायडे ह्या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य कौशल्याबाई साठे, प्रियाताई पाठक,सरपंच शेख जमीर भाई शेख गणीभाई, उपसरपंच अमोल तायडे हे होते याप्रसंगी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या गीतावर नृत्य सादर केले. शिक्षणाबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व व्यक्तिमत्व विकास व्हावा याकरिता शाळेत नियमितपणे विविध उपक्रम तथा संस्कृती कार्यक्रम ठेवण्यात येतात यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक आणि ग्रामस्थांनी सांस्कृतिक व डान्स या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला विद्यार्थ्यांनी शाळेची अभ्यासाची गोडी निर्माण होईल आणि त्यांना आनंदमय शिक्षणाचा अनुभव मिळावा यासाठी संस्कार विद्या मंदिर मधील सर्व शिक्षक व शिक्षिका प्रयत्नशील असतात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार विद्या मंदिराचे अध्यक्ष डीगंबर घुगे शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमांमध्ये गावातील जितेंद्र बडे, गोरखनाथ भागवत,धीरज मंत्री,अनिस बागवान,विठ्ठल भागवत,सोहेल पठाण,अजिंक्य मेडशीकर,पोलीस पाटील अनिताताई चोथमल दत्तराव, घुगे व मोठ्या संख्येने पालक वर्ग यांची उपस्थिती होते.