प्रमोद अहिनवे तालुका प्रतिनिधी जुन्नर
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत होती. दरम्यान आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तारीख निश्चित झाली असून येत्या २६ मार्च रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रवेश करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे राहणार असून संसदरत्न ,विदयमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिरुरची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती. आता महायुतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर परस्परसहमतीने शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट झालं. ते येत्या २६ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थक देखील राष्ट्रवादीत दाखल होतील असे बोलले जात आहे. शिरुरमधून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आज संध्याकाळी जागावाटपावर शिक्कामोर्तब होईल असं सुनील तटकरे म्हणाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाच पंतप्रधान बनवायच. ४५ पेक्षा जास्त खासदार निवडणूक आणण्याचे आमचे उद्दिष्टय आहे असं सुनील तटकरे म्हणाले. शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? असे बाळबोध प्रश्न आता विचारु नका. राष्ट्रवादीचा उमेदवार शिरुरमधून मोठ्या फरकाने विजय मिळवेल. शिरुर-आंबेगाव येथे पक्ष प्रवेशाची मोठी सभा होईल असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले. पक्ष प्रवेशाआधी माझ एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण झालं आहे. त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल आहे असं आढळराव पाटील यांनी सांगितलं. माझ्या कॅलक्युलेशननुसार पहिली निवडणूक ३० हजारने जिंकली. दुसरी एक लाखाने, तिसरी तीन लाखाने आता चौथी निवडणूक रेकॉर्ड मताने जिंकेन, हा मला नाही जनतेला सुद्धा विश्वास आहे असं मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)