विश्वास काळे उप जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
उमरखेड : विडुळ येथे सार्वजनिक महिला मंडळाच्या वतीने व उमामेश्वर मंदिर विडूळ यांच्या सहकार्याने आज दिनांक १०मार्च २०२४ रोजी समस्त विडूळ गावातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व महिलांना कलागुन सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं या प्रमुख उद्देशाने जागतिक महिला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निधी नितीन भुतडा सामाजिक कार्यकर्त्या उमरखेड. अनुजा नामदेवराव ससाने सामाजिक कार्यकर्त्या उमरखेड शांताबाई इंगळे प्राचार्य नीता कमठाने सरपंच वंदना कोत्तेवार , वागरकर ताई सामाजिक कार्यकर्त्या या उपस्थित होत्या. याप्रसंगी महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता रांगोळी स्पर्धा एक मिनिट स्पर्धा उखाणे स्पर्धा प्रश्नमंजुषा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित करून विजेत्या महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या तसेच संघर्षमय जीवन जगून आपल्या कुटुंबाप्रती जबाबदारी जाणीव ठेवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी सचिन पाठमासे यांनी केली असून प्रास्ताविक परिचय अनुक्रमे सविता कोतेवार भाग्यश्री संगेवार नंदिनी भोसले यांनी तर आभार पंचवटी पांचाळ यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गावातील सर्व महिलांचे सहकार्य मिळाले.


