सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
श्री क्षेत्र सच्चिदानंद आश्रम सावत्रा येथे
दरवर्षी संपन्न होणारा गुरू पौर्णिमा उत्सव दि 23 शुक्रवारी मर्यादित स्वरूपात कोरोणा नियमांचे पालन करित.अंत्यत उत्साहाने व भक्ती भावाने
श्रीगुरु पौर्णिमा महोत्सव संपन्न झाला . श्री गुरु पौर्णिमे निमीत्त .प पु श्री 1008स्वामी अमोलानंद महाराज यांच्या पवित्र गोड वाणीतुन श्री हरी किर्तन झाले.किर्तनातुन पुज्य महाराज श्रींनी श्रीगुरूचे महत्त्व प्रतिपादन केले.गुरु कसा असावा तर गुरुचा प्रभाव पाहुन गुरु करू नये .तर स्वभाव ओळखुन गुरु करावा .कारण प्रभाव काही कालानुरुप कमी होत असतो तर स्वाभाव हा कधीच बदलत नसतो असे पुज्य महाराज श्रींनी किर्तनच्या माध्यमातून सांगितले
समाज सेवा .वृक्षा रोपण. गौ रक्षण . अनाथाची सेवा करा असा उपदेश भक्ता दिला नंतर संत संताराम जी महाराज यांची आरती करण्यात आली प पु.श्री 1008 स्वामी अमोलानंद महाराज यांच्या हाताने भक्तांना प्रासाद वितरण करण्यात आले . प पु महाराज श्रीं 1008स्वामी यांच्या उपस्थितीत गुरू पौर्णिमा उत्सव सोहळा संपन्न झाला.
..

