नाजुकराव खंडारे तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर
मुर्तिजापूर : शहरातील लकडगंज परिसरातील बौद्ध विहार येथे मुर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मेश्राम यांचा सत्कार महिलांच्या वतीने करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून उपनिरीक्षक मेश्राम हे मुर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावत आहेत आपल्या कर्तव्यासोबतच त्यानी शहरात व तालुक्यांमध्ये सामाजिक तथा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन सामाजिक मार्गदर्शन केले त्यामुळे शहरात त्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती उपनिरीक्षक मेश्राम यांची नुकताच मुर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनमधुन बदली झाली आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन मुर्तिजापूर शहरातील लकडगंज परिसरातील महिलांनी त्यांचा सत्कार बौध्द विहार येथे केला यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.


