मकरंद जाधव तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी) पुणे यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत (CSMS DEEP) डिप्लोमा कोर्सच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमार्फत ‘सरदार हिरोजी इंदुलकर किल्ले संवर्धन’ मोहिमेतंर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत उप व्यवस्थापकीय संचालक संदीप पवार सारथी, MKCLरायगडचे मंगेश जाधव, सिद्धेश गोसावी, विश्वास मते, माधव गोरे व श्रीवर्धन तालुक्यातील सारथी प्रकल्पाचे क्रिएटिव्ह इन्फोटेकच्या केंद्र समन्वयक कल्याणी तोडणकर, केंद्र प्रशिक्षक पुर्वी वाडिया, श्रीलेश दवटे आणि क्रिएटिव्ह इन्फोटेकचे विद्यार्थी सुशील जाधव, साईराज कदम,ओंकार पार्टे,साहिल पवार,तन्वी चव्हाण,दिव्या माळी,सृष्टी काप,स्नेहा भोगल,मुक्ति मांडवकर,दर्शना मांडवकर तसेच रायगड जिल्ह्यातील आस्क मी कॉम्पुटर आणि शरयू कॉम्पुटर एज्यूकेशन माणगांव, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट गोरेगांव, आयकॉन कंम्प्युटर्स म्हसळा, सरस्वती कॉम्पुटर एज्यूकेशन बोर्लीपंचतन,करिअर कॉम्पुटर महाड,समृद्धी कॉम्पुटर पोलादपूर या केंद्रांचे केंद्रचालक,केंद्र सहाय्यक व विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गडावरील सर्व प्लास्टिक व इतर प्रकारचा कचरा उचलून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली. विद्यार्थ्यांचे कार्य पाहून गडावर पर्यटनास आलेल्या सर्वच पर्यटकांनी व सारथीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.केंद्रांमार्फत विद्यार्थ्यांची अल्पोआहार,जेवण व जाण्या येण्याची संपूर्ण सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश गड किल्ल्यांचं संवर्धन,स्वच्छता राखणे असा होता.साफसफाई नंतर MKCL रायगड टीमच्या वतीनं विद्यार्थ्यांना सारथी योजनांचे थोडक्यात मार्गदर्शन करुन रायरेश्वराच्या मंदिरात दर्शन घेउन या स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली.