शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
मानवत :जेव्हां पालक वर्गात प्रत्यक्ष वर्ग अध्यापन करतात. ती शाळा म्हणजे पी. एम श्री जि. प.ल्के.प्रा.शा. मानवत या शाळेतील शिक्षकांची मराठा सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक झाली आणि वर्ग अध्यापनाचा प्रश्न निर्माण झाला. तेंव्हा शाळेतील पालक बंधू आणि भगिनींना आवाहन केले आणि चक्क वर्ग अध्यापन साठी पालक वर्ग सरसावला. या कामी श्रीमती मंगल नितीन बारहाते, श्रीमती लता कपिल कच्छवे, श्रीमती जया देविदास चिंचकर, हिना जफरखान पठाण तसेच एकनाथ पांचाळ या पालकांनी वर्ग अध्यापन केले.ते ही कोणतीही अपेक्षा न ठेवता तेव्हांच शाळा नावारूपाला येत असतात. जेंव्हा पालक शाळेसाठी वेळ देतात. अशा सहकार्य वृत्तीमुळेच पी.एम श्री जि. प. के. प्रा. शा. मानवत आज विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने जिल्ह्यात जिल्हा परिषदेची प्रथम क्रमांकाची शाळा बनलीय. ज्या शाळेत पालक व शिक्षक संबंध दृढ असतात त्या शाळेची गुणवत्ता कोणीही रोखू शकत नाही. पालकांच्या या कार्याला मानाचा मुजरा.