मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी : शहर पोलीस स्टेशनचे पीआय श्री संजय लोहकरे यांनी नुकताच पीआय पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न झाला.
परळी शहर पोलीस स्टेशनच्या पीआय श्री.सानप साहेबांची बदली झाली व त्यांच्या जागी नवीन पीआय म्हणून श्री संजय लोहकरे यांनी पदभार स्वीकारला आहे. पोलीस स्टेशन मध्ये त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. संजय लोहकरे हे अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी तसेच अवैध धंदे कमी होण्यास मदत होईल. पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य माणसाची कामे पडतात त्यामुळे त्यांच्या कामांना साहेब न्याय देतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी व्यक्त केला. यावेळी पत्रकार मोहन चव्हाण, सुधाकर गीते, अंबादास पोपळघट आदी उपस्थित होते.


