दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : देहेरे पैकी कडव्याचीमाळी हा पाडा 70 घरांचा त्यापैकी 70 % घरे ही कातकरी समाजाचे आहेत.येथील कातकरी समाजाचे जीवन हे उघड्यावर संसार अस आहे.ऐक वर्षा मध्ये पावसाळी लावणीचे 4 महिने सोडले तर 8 महिने हे पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार निमित्ताने गवत कापणे.वीट भटी व इतर रोजंदारी कामे करण्यासाठी गावाबाहेर घालवावे लागत असे व त्यांच्या संसार हा उघड्यावर पडायचा.हे नेहमी चालायचे व यातून या गावातील या समाजाचे नेहमीच दुःख सोडवण्याचा निश्चिय जयदेव घेगड सर यांनी करून कडव्याचीमाळी येथील कातकरी समाजचे 14 कुटुंब एकत्र घेऊन ऐक शेतकरी बचत गट तयार करून त्याचे रजिस्ट्रेशन करून घेतले. पुढे जाऊन याच बचत गटामार्फत प्रकल्प ऑफिस जव्हार मानव विकास अंतर्गत वीट भट्टी योजना साठी प्रस्ताव सादर केला व 100% कातकरी समाज बचत गट असल्याने योजना मंजूर ही झाली.परंतु खरी अडचण अझूण संपलेली नव्हती.कारण योजना मंजूर झाल्यानंतर 10% बचत गट समभाग ऐक लाख रुपये भरावा लागणार होता व हा समभाग स्वतःउभ करणाचे जयदेव सरांनी ठरवून आपली पुंजी असलेली 1 लाख रुपये समभाग भरण्याचे विश्वास देऊन ते त्यांनी बचत गटास दिले.कडव्याची माळी येथील कातकरी समाज हा दुसऱ्यांच्या जागेत घर बांधून राहत असल्याने विटभट्टी साठी जागा व पाणी ही अडचण होती तिही यशस्वीरित्या सोडवण्याचे काम जयदेव सरांनी केले.सदर बचत गटाचे अध्यक्ष. रामचंद्र गावित व उपाध्यक्ष बाळकृष्ण गावित.व सचिव अरविंद वाघ यांच्याशी सवांद साधला असता जयदेव सर हे आमच्या साठी मदतीचा आधारवड असुन बचतगट तयार करण्यापासून वीट भट्टी योजना मिळवून देणे पर्यंत सर्व आर्थिक अडचण दूर करणे या सर्व गोष्टी त्यांनी घडवून आणल्या. व आज आमच्या कातकरी समाजाची 14 कुटुंब यांना रोजगारासाठी पाठीवर संसार घेऊन फिरण्याची गरज नाही.या जयदेव सरांच्या मदतीच्या आधारावर व प्रकल्पच्या मानव विकास योजनेअंतर्गत केवळ रोजगारच नाही तर आमचे जीवनमान सुधारण्यासाठी खुप मोठी मदत झालेली आहे.केवळ ह्या योजनेसाठीच नव्हे तर आमच्या गावातील आमच्या समाजातील कोणतीही अडचण असो.आर्थिक,शैक्षणिक आरोग्य विषयक.प्रत्येक वेळेस जयदेव सर सर्वांचा मदतीला धावून येतात व नेहमी मदतीचा आधारवड त्यांच्या असतो प्रत्येक गावात जयदेव सरांसारखं ऐक व्यक्तिमत्व असेल तर माणुसकी जिवंत आहे असं म्हणता येईल.ही बातमी देतांना जयदेव घेगड सर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी माणुस म्हणून जगात असताना नोकरीला लागलो. नोकरीमुळे मी माझा घराचे पोट भरण्यात ध्यन्यता न मानता माझा सोबत माझा सहकारी समाजातील 14-15 कुटुंबाचे पोट भरेल तरच आपण माणुस म्हणून धन्यता मानता येईल.व तरच माणसातील माणुसकी जिवंत आहे असे म्हणता येईल.या बचत गटासाठी 2 वर्ष मेहनत करून या गोष्टी घडवून आणल्या व यातील बरेच सदस्य हे वीट भट्टी कामानिमित्त भिवंडी बोईसर सेलवास या ठिकाणी जात होते आज त्यांना कामगार म्हणून कामावर जायची गरज नसून मालक म्हणून काम करून आपले जीवन सुखात जगता येईल.शेवटी आपला परिवारा चालवून 2 पैसे शिल्लक असणाऱ्या माणसांनी रोजगारसाठी आपल्या समाजासाठी मदत केली तर माझा सोबत माझा समाज प्रगती करेल व ते सुखाने जगातील हा विचार कडव्याचीमाळी येथील या जयदेव घेगड सर यांच्या शेतकरी बचत गट हे उदाहरण आहे.


