सोहेल खान
शहर प्रतिनिधी, पांढरकवडा
पोलीस ठाणे पांढरकवडा हद्दीत दिनांक ०१/०२/२०२४ रोजीचे रात्री १०/०० ते दिनांक ०२/०२/२०२४ रोजीचे ०८ वाजता दरम्याण पांढरकवडा ते मांगुर्डा रोड वरील गेवराई गावाचे पलीकडील ग्राम वाई रोडवर
सचिन तुकाराम कुनघाडकर वय २३ वर्षे, रा. चंद्रशेखर वार्ड पांढरकवडा यास डोक्यावर व कपाळावर मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याची घटना घडली होती सदर घटने संबंधाने दिनांक ०२/०२/२०२४ रोजी मृतकाचे चुलते रमेश मारोती कुनघाडकर रा. बेतवार लेआउट पांढरकवडा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपो विरुध्द अपराध क्रमांक १२२/२०२४ कलम ३०२ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा क्लिष्ट स्वरुपाचा व गुन्हयातील आरोपी संबंधाने कोणताही पुरावा घटनास्थळी मिळून न आल्याने अज्ञात आरोपी शोध करणे शर्तीचे होणार हो बाब लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक सो. यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील पथकासह उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय पांढरकवडा व पोलीस ठाणे पांढरकवडा यांचेकडील पथके तयार करुन आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्या करीता आदेशीत केले होते. त्यावरुन सर्व पथके आपआपले कौशल्य पणाला लावुन गुन्हा उघडकीस आणने करीता शर्तीचे प्रयत्न करीत होते. मृतका संबधाने माहिती गोळा करुन त्यादृष्टीने आपआपले गोपणीय बातमीदार पथकांनी पांढरकवडा व परिसरात नेमले होते अशातच स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपणीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, मृतक सचिन तुकाराम कुनघाडकर हा दिनांक ०१/०२/२०२४ रोजी रात्री त्याचे मित्र १) सय्यद अरबाज उर्फ भुन्या सव्यद मन्सुर रा. मस्जीद बार्ड, पांढरकवडा २) अब्दुल रहमान अब्दुल जब्बार रा. मोमीनाबाद कॉलणी पांढरकवडा यांचेसह दारु पिला होता त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकांनी क्षणाचाही विलंब नकरता नमुद दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन सचिन तुकाराम कुनघाडकर हा त्यांचा मित्र असल्याचे व नमूद दोघानींही दिनांक ०१/०२/२०२४ रोजी रात्री त्याचे सोबत दारु पिवुन सय्यद अरबाज उर्फ भुन्या सय्यद मन्सूर याचे सोबत असलेल्या जुन्या वादाचे कारणावरुन त्यास मांगुर्डा रोड वरील गेवराई गावाचे पलीकडील ग्राम बाई रोड परिसरात नेवून काठीने व डोक्यावर दगड टाकुन त्यास जिवे ठार मारले असल्याची कबुली दिली असल्याने नमुद दोन्ही आरोपीतांना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे पांढरकवडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक, श्री. पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा श्री. रामेश्वर वैजने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ श्री. आधारसिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, अमोल माळवे पो.स्टे. पांढरकवडा, सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधीर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, चापोहवा नरेश राउत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ तसेच पोलीस ठाणे पांढरकवडा येथील पथक यांनी यशस्योरित्या पार पाडली.