संजय गवळी ग्रामीण प्रतिनीधी अकोट
समाजात पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे . निष्पक्ष ,निकोप व पोषक वातावरण ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे .या सामाजिक ऐक्यात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अतुल खोटरे यांनी केले .ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल , राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटन ए जे एफ सी च्या अकोला जिल्हा मेळाव्यात पत्रकार दिनानिमित्त ते बोलत होते .यावेळी प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव बालमुकुंद भिरड ,दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश वानखडे ,बाबाराव इंगळे ,जि प सदस्य योगेश वडाळ ,वंचित बहुजन चे तालुका संघटक सुरेंद्र ओईबे ए जे एफ सी चे केंद्रीय सदस्य तथा जेष्ठ पत्रकार निलेश पोटे ,ए जे एफ सी चे प्रदेशाध्यक्ष राहुल कुलट ,ए जे एफ सी चे जिल्हा अध्यक्ष किरण सेदाणी ,ए जे एफ सी चे जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार चिंचोळकर ,ज्येष्ठ पत्रकार कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाऱ्याचे संचालक शाम भोपळे, चोहटां बाजार ग्रामपंचायत सरपंच सुभाष मुकुंदे ,टाकळी ग्रामपंचायत सरपंच निळकंठ वसु ,आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करत थोर पुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .त्यानंतर प्रस्ताविक ए जे एफ सी जिल्हाध्यक्ष किरण सेदाणी यांनी केले .यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव बालमुकुंद भिरड यांनी बदलत्या प्रसार माध्यमा च्या बाबत विचार व्यक्त केले .प्रसार माध्यमे तंत्रज्ञानाचा अवलंब करीत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांनी ते आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले .दहिहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांनी पत्रकार व पोलिसांच्या समन्वयातून समाजातील अनेक बाबींना आळा घालता येतो .त्यामुळे सामाजिक एकता कायम ठेवण्यास मदत होते असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले .याप्रसंगी जि प सदस्य योगेश वडाळ यांच्यासह प्रमुख अतिथींचा सन्मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला .दुपारच्या दुसऱ्या सत्रात एजेएफसी चे केंद्रीय सदस्य निलेश पोटे यांनी संघटनेतील वाटचाल पुढील कार्या कामाबद्दल बद्दल उपस्थित पत्रकार बांधवांना मार्गदर्शन केले .यावेळी अकोला जिल्ह्यातील उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांना गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन इंगळे सर यांनी केले या कार्यक्रमाला अकोला जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
चौकट ##### कार्यक्रमात
या पत्रकार बांधवांचा झाला सत्कार
- अकोला जिल्ह्यात उत्कृष्ट पत्रकार संघ म्हणून प्रेस क्लब हिवरखेड ची निवड करण्यात आली . प्रेस क्लब ला गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
या वेळी ग्रामीण भागातील पत्रकार हर्षल कोल्हे ,विनोद वसू अमर मुंडाले ,सुनील बांगर ,राजकुमार मुंडाले ,उमेश खंडारे, योगेश भगत ,संदीप तरोळे ,पंकज पाखरे, एकनाथ आढे,अमोल राणे, पवन वर्मा यांच्यासह शामराव सुलताने मिलिंद जामनिक ,शाहिद ईकबाल , किशोर अवचार, सतीश चिकटे, बाळासाहेब नेरकर , दामोदर कपले ,गणपत सांगळे ,दयाराम घनबहादूर , मनोज भगत, एस के राऊत या पत्रकारांचा गौरवचिन्ह देवुन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .