सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
हिवरा आश्रम येथील वंचीत मुलांच्या नित्यानंद सेवा प्रकल्पाला संजीवनी सेवाभावी ट्रस्ट बुलढाणा यांच्या तर्फे दर महा अन्न छत्रासाठी रुपये 5000 हजाराचा किराणा पोहोच करून सामाजिक ऋण फेडण्याचा संकल्प सिद्धिस जात आहे.
जी प शिक्षक अनंत शेळके यांनी अकरा वर्षांपासून सुरु केलेल्या या वंचीत मुलांच्या सेवायज्ञात समाजाच्या विविध स्तरातील दाते उस्फुर्तपणे या सेवायज्ञात आपल्या समिधा अर्पण करीत आहेत.
बुलडाणा येथील संजीवनी सेवाभावी ट्रस्ट च्या वतीने दर महा रुपये 5000हजाराचा किराणा नियमित पोहोच केला जातो. महिन्या अखेर संजीवनी मार्फत यादी मागवली जाते व तात्काळ किराणा प्रकल्पावर पोहोच केला जातो. येथील 30गरजू मुलांच्या अन्न छत्रासाठी भक्कम आधार संजीवनीच्या वतीने मिळाल्याची कृतार्थ भावना अनंत शेळके यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रातील अनेक सेवाप्रकलपाना विविध रूपात मदतीचा हात देण्यात अग्रकर्मी असलेल्या संजीवनीच्या उस्फुर्त उत्तरदायित्वाने अनेक सामाजिक प्रकलपाना दातृत्वाची संजीवनी मिळत आहे.