अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातूर ( दि.२४ जूलै, २०२१)-
स्थानिक डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात वरील विविध विकास कामाचे सोहळ्याचे उद्घाटन संपन्न झाले. यामध्ये आवार भिंतीचे भूमिपूजन, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उद्घाटन आणि वनस्पती उद्यान व महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप इंगोले, कोषाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती तथा अध्यक्ष, महाविद्यालय विकास समिती हे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केशवराव मेतकर कार्यकारिणी सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती तथा सदस्य महाविद्यालय विकास समिती हे होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये विचारपीठावर एच.यु. सपकाळ, माजी प्राचार्य तथा आजीवन सभासद, श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती,डॉ. कृष्णराव भुस्कुटे, सदस्य, महाविद्यालय विकास समिती, मा. गुलाबराव पाटील, सदस्य, महाविद्यालय विकास समिती,दादाराव देशमुख, आजीव सभासद, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती,अशोकसिंह रघुवंशी, सदस्य, महाविद्यालय विकास समिती,डॉ. प्रकाश अंधारे, सदस्य, महाविद्यालय विकास समिती तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रकाशराव गावंडे, आजीवन सभासद,श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती, नारायणराव अंधारे, विलास हरणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे संगीत विभागाद्वारे
प्रा.मंगेश राऊत आणि चमू यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले.त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. प्रकाशराव अंधारे यांचा सेवानिवृत्ती निमित्त दिलीप इंगोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण खंडारे सर यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी पॅावर पॅाईंट प्रेझेंटेशन पीपीटी द्वारे महाविद्यालयाच्या विकासाचा आणि भविष्यकालीन योजनांचा आलेख मान्यवरांच्या समोर सविस्तरपणे मांडला. नवीन सुधारणा, नवीन तंत्रज्ञान आणि येणाऱ्या काळाशी जुळवून घेण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याची सविस्तर माहिती त्यांनी मान्यवरांसमोर मांडून ह्या सर्व योजना महाविद्यालयात पूर्ण करण्याबद्दल आपल्या मदतीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे हे सांगुन महाविदयालयाचा सर्वतोपरी विकास करण्याची हमी दिली.
कार्यक्रमाच्या उद्घाटकीय भाषनात केशवराव मेतकर यांनी आयोजीत विविध विकास कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे रितसर जाहीर केले. आणि आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, शिक्षणानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणे हीच खरी समाजसेवा आहे. कारण आज समाजासमोर अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. कारण नवनवीन गोष्टी, नवनविन शोध हे मानवाला गतिमान करण्याची प्रक्रिया आहे. आणि त्यामुळेचं मानवाचे जीवन समृद्ध होते. त्यामुळे आपण सातत्याने संशोधनाच्या कार्यामध्ये व्यस्त राहून समाजासाठी त्याचा काय उपयोग होईल याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले.यानंतर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले एच. यु. सपकाळ यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले सोबतचं जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्याने चांगले कार्य करण्याची एकजुटीने कार्य करण्याची गरज आहे. तरच संस्थेचा विकास होतो हे सांगतांना त्यांनी संस्थेला प्रगत करण्यासाठी मानव संसाधने विकसीत करण्यावर भर दिला. भाऊसाहेबांनी ज्या उद्देशाने ही शिक्षण संस्था निर्माण केली तो उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मनोभावे कार्य करणे हीचं भाऊसाहेबांना विनम्र आदरांजली राहील असे प्रतिपादन करुन येणाऱ्या काळाची पावले ओळखून स्वतःला अपडेट करणे गरजेचे आहे त्यासाठी वाचनाची कास विद्यार्थ्यांनी धरणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.यानंतर प्रमुख अतिथी म्हणून विलास हरणे यांनी आपल्या भाषणांमधुन सांगीतले की, संस्था चांगल्या कार्यासाठी, नवीन उपक्रमासाठी नेहमीचं कर्मचाऱ्यांच्या सोबत असते. संस्थेची प्रगती हा ध्यास ठेवून सर्वांनी कार्य करावे असे प्रतिपादन केले.यानंतर दादाराव देशमुख यांनी शेती आणि मातीशी इमान राखुन शेती कशापद्धतीने समृद्ध करता यावी याचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकरीता सुविधा कशा वाढविता येतील महाविद्यालयाची प्रगती विद्यार्थ्यांचा विकास महाविद्यालयांमधील साधनसामुग्री यासाठी संस्थेने आम्हाला मार्गदर्शन आणि मदत करावी असे प्रतिपादन केले. सत्काराला उत्तर देताना डॅा. प्रकाश अंधारे यांनी सांगितले की, मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.आणि माझा सत्कार माझ्या महाविद्यालयाने सेवानिवृत्तीनिमित्त घेतला यासारखी दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी नाही हा माझा सन्मान आहे. मी या महाविद्यालयाच्या कार्यासाठी संस्थेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहील त्या प्रगतीमध्ये माझाही वाटा राहील याची हमी त्यांनी दिली. नारायणराव अंधारे यांनी भाऊसाहेबांवर एक कविता सादर करून संपूर्ण जीवन चरित्र त्यांनी या कवितेमधून मांडले.अध्यक्षीय भाषणामध्ये दिलीप इंगोले यांनी सांगितले की आज ऑनलाईन शिक्षण ही काळाची गरज आहे त्यासाठी शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणे गरजेचे आहे.येणारा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे. यासाठी आपण सक्षम विद्यार्थी तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी महाविद्यालयाचा विकास करणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम शिक्षक केंद्रित उपक्रम संस्था स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये चालवले जात आहेत याची माहीती दिली. भाऊसाहेबांनी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी, देशाच्या विकासासाठी जे स्वप्न पाहिलेलं होतं ते प्रत्यक्षात उतरवण्याचे कार्य संस्था सातत्याने करीत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मनोभावे आपले कार्य करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. दिपाली घोगरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.कु. नेहा कुलट यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी शासनाच्या कोव्हीड-१९ च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करुन उपस्थित होते. मास्क आणि सॅनीटायझर ची व्यवस्था शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यात आली.